मांगी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरण्याची बागल यांची घोषणा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज (सोमवार) विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या हस्ते पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना गुलाब पुष्प, मिठाई व खेळणी देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कवले, शिक्षिका सुवर्णा महामुनी, सौ. पवार, सौ. देमुंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे उमेश बागल, निखिल बागल, पोलिस पाटील आकाश शिंदे, किशोर बागल, शिवाजी राऊत उपस्थित होते. मांगी जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी स्वतः भरणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बागल यांनी यावेळी जाहीर केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी कमी होत असल्यामुळे शाळेचे वर्ग बंद पडत आहेत. परंतु असे उपक्रम राबवल्यास नक्कीच प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *