करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या आज (शनिवार) पुण्यात भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमावेळी मंचावर उपस्थित होत्या. या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सहकार विभागाच्या डीजीटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शहा यांच्या हस्ते झाले. बागल यांच्या उपस्थितीमुळे करमाळा तालुक्यातील राजकारणामध्येही चर्चा सुरु झाल्या आहेत. बागल यांच्या ताब्यात असलेला मकाई कारखाना अडचणीत आहे. तो अडचणीतून काडण्यासाठी काही मदत मिळवण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत का? अशी चर्चा यातून सुरु झाली आहे.