करमाळा (सोलापूर) : जेऊर येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने मंगळवारी (ता. ९) श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार आहे. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दुपारी २ वाजता हे व्याख्यान होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सचिव प्रा अर्जुन सरक यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झरे येथील नारायण आमरुळे हे असणार आहेत. या कार्यक्रमात दहावी, बारावी बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य, आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचे सत्कार व बक्षीस वितरण केले जाणार आहे. भारत शैक्षणिक संकुलाचे हे ६४ वे वार्षिक स्नेहसंमेलन आहे.
बुधवारी (ता. १०) दुपारी २ वाजता विविध गुण दर्शन कार्यक्रम होणार आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच भारत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. संस्था उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, महाविद्यालय प्राचार्य डॉ. अनंतराव शिंगाडे, भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन. डी. कांबळे, पर्यवेक्षक बी. एस. शिंदे, भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, शिक्षक चिटणीस पाटकुलकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.