करमाळा (सोलापूर) : दिल्लीत भाजपने यश मिळवल्यानंतर करमाळ्यात भाजपने आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. गायकवाड चौक येथील भाजप संपर्क कार्यालयासमोर ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
चिवटे म्हणाले, ‘दिल्लीत भाजपचे सरकार बहुमताने आले आहे. केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारवर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये सरकार आले आहे. दिल्ली देशाची राजधानी असल्याने तिथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते. दिल्लीत सरकार आल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्व मोदी यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे, सरचिटणीस गणेश वाळुंजकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष राजू सय्यद, नानासाहेब अनारसे, डॉ. किरण शिंदे, कमलेश दळवी, राजेश पाटील, नानासाहेब अनारसे, गौतम दळवी, राजेश पाटील, गणेश वाळुंजकर, सुनील नेटके, विनोद इंदलकर, महादेव गोसावी, गणेश गोसावी आदी उपस्थित होते.