Breaking : सालसेजवळ अपघात, चौघांवर बार्शीत उपचार सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा ते आवाटी रस्त्यावर सालसेजवळ अपघात झाला असल्याचे समजत आहे. आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील तीघेजण जखमी झाले असल्याचे प्रथमदर्शनी सांगत आहेत. यातील जखमींना बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले आहे, असे केशव प्रतिष्ठाणचे रुग्णवाहिका चालक बबलू भिसे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. यातील मोटारसायकलस्वार यांची दुचाकी पुलाच्या कठाड्याला धडकली असल्याचे समजत आहे, मात्र या अपघाताचे कारण समजलेले नाही.

बळीराम सुब्रान हजारे (वय 54), दिलीप आबा गोफणे (वय 55), आण्णा मालदेव हजारे (वय 48) व राहुल विखे (वय 38, सर्व रा. कौडगाव, ता. परांडा, जि. धाराशीव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बार्शीत उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *