सोलापूर : महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून मोहोळ, माढा व करमाळा मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली असून विकास कामांस मोठ्याप्रमाणात निधी दिला असून येणार्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडुन आणा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी केले आहे.

सोलापूर येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, करमाळा तालुकाध्यक्ष भारत आवताडे, तालुका कार्याध्यक्ष सुजित बागल, बाळकृष्ण सोनवणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमदार शिंदे, आमदार माने व माढ्याचे आमदार बबनदादा यांना विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे. केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करा व कार्यकर्त्यांना बळ द्या.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *