Changes in traffic route in Shingnapur Ghat till August 22

सोलापूर : हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेअंतर्गत डाळज- कळस- नातेपुते- शिंगणापुर- दहिवडी- पुसेसावळी ते कराड रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शिंगणापुर घाटातील 500 मीटरचा रस्ता सुधारण्याचे काम पूर्ण करण्यासाठी 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला होता. सदर कालावधीत घाट रुंदी करणाचे कामास आलेल्या नैसर्गिक अडचणीमुळे दुरूतीसाठी आणखी कालावधी लागणार असल्याने घाटातुन जाणारी वाहतुक 22 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत.

शिंगणापुर घाटातील लांबीत घाट फोडुन रस्ता रूंदीकरणासाठी घाट खोदाई करताना दगड, मुरूम रस्त्यावर येऊन येणाऱ्या-जाणा-या वाहनांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 8 ते 22 ऑगस्ट 2023 या कालावधीत रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याने सदरच्या मार्गावरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग- नातेपुतेकडून शिंगणापुरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी नातेपुते- पिंपरी- कोथाळे – शिंगणापुर या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी. तसेच शिंगणापुरकडून – नातेपुतेकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी शिंगणापुर- कोथाळे- पिंपरी- नातेपुते या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *