सोलापूर : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम अंतर्गत 2024- 25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्हयास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रु.130. 05 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे. सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रुट, अॅवोकॅडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 एचपी पर्यंत, पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी / फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर इत्यादी घटकांचा समावेश आहे.

या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांच्या नावे स्वतःची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकरीकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्हयातील अनुसुचित जाती प्रवर्गातील जास्तीत-जास्त शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *