Call for contact for destitute childrenCall for contact for destitute children

सोलापूर : पिनी देवकते (वय 7) ही बालिका सांगोला पोलिस स्टेशन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने व राधिका राजु निंबोळे (वय 12) ही बालिका एमआयडीसी पोलिस स्टेशन व चाईल्ड लाईन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापुर यांचे आदेशाने तसेच मल्ली (वय 10) ही बालिका लोकमार्ग पोलिस स्टेशन व चाईल्ड लाईन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, ही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्र. – 7219104503 किंवा बाल कल्याण समिती, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/बालगृह, 937/9,नार्थ सदर बझार,सोलापूर यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *