बेवारस बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

Call for contact for destitute children

सोलापूर : बेवारस बालकांसाठी 30 दिवसाच्या आत मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, उत्तर सदर बाजार किंवा आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वसंत विहार किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे (7219104503) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साई व अर्जुन ही बालके तेलंगणा (जि. वारंगल) येथे बेवारस सापडली आहेत.

बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने 22 एप्रिल 2019 रोजी मंगेश हे बालक लोहमार्ग पोलिस स्टेशन, सोलापूर मार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने 4 मार्च 2020 रोजी, शांतम्मा व विठ्ठलगौडा ही बालके जोडभावी पोलिस स्टेशन, सोलापूर मार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने 23 जून 2019 रोजी मुलांचे निरीक्षणगृह/ बालगृह सोलापूर या संस्थेत दाखल करण्यात आली आहेत. तसेच नरेंद्र परमेश्वर मोची हे बालक बाल कल्याण समितीच्या आदेशाने 13 जून 2022 रोजी आई बहुउद्देशीय बालगृह, सोलापूर या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे. तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, ही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे (7219104503) किंवा बाल कल्याण समिती, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/ बालगृह, 937/9, नार्थ सदर बझार, सोलापूर व आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वसंत विहार, सोलापूर यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *