When Karan Johar went to Rani Mukerji wedding after lying to his mother only 18 people were invitedWhen Karan Johar went to Rani Mukerji wedding after lying to his mother only 18 people were invited

प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचे लग्न २०१४ मध्ये झाले. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणारी राणी ही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री होती. राणी आणि आदित्य चोप्रा यांच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच एक गोष्ट समोर आली आहे. त्याचे कारण म्हणजे राणीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलायला आवडत नाही. मात्र एका कार्यक्रमात करणने या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितले आहे.

काजोल आणि राणी मुखर्जी ‘कॉफी विथ करण सीझन ८’च्या सहाव्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. याच दरम्यान दिग्दर्शक निर्माता करण जोहरने राणी आणि आदित्यच्या लग्नाची गोष्ट सांगितली. करण जोहर त्यांच्या लग्नावेळी ‘२ स्टेट्स’ चित्रपटाचा रिलीज इव्हेंट सोडून लग्नात पोहोचला होता. राणी आणि आदित्य यांचे डेस्टिनेशन वेडिंग मँचेस्टरमध्ये पार पडलं होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लग्नासाठी फक्त १८ जणांना आमंत्रण देण्यात आले होते.

राणी आणि आदित्य यांनी गुपचूप लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राणीला तिचे लग्न अतिशय एकांतात कोणत्याही गडबड गोंधळाशिवाय करायचे होते. त्यामुळे तिने लग्नासाठी फक्त १८ जणांना आमंत्रण दिले होते. करण म्हणाला, ‘त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक आले होते. राणीने तर मलाही ताकीद दिली होती जर बाहेर कुणाला आमच्या लग्नाबद्दल समजले तर ते तुझ्यामुळेच झालंय असे मी समजेन त्यामुळे मी कुणालाही काही सांगितले नाही. माझ्या २ स्टेट्स या चित्रपटाचे रिलीज सोडून मँचेस्टरला जात होतो. आईने विचारले की तू तिकडे का जातोयस? तेव्हा तिच्याशी खोटे बोलून लग्नासाठी आलो होतो. मी अगदी हट्ट करून आलो होतो’, असे त्याने सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *