These are alternatives to Makai sakhar karkhana Karmala taluka to bring money to farmersThese are alternatives to Makai sakhar karkhana Karmala taluka to bring money to farmers

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याकडे गेल्यावर्षीचे थकीत ऊस बिल राहिले असल्याने संतप्त शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. कालच (मंगळवारी) पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनासमोरच एका आंदोलक शेतकऱ्यांने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्कतेमुळे अनर्थ टळाला आहे. याची तीव्रता वाढत चालली आहे. काहीही करून शेतकऱ्यांचे पैसे द्या, अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने पैसे देण्यासाठी काय पर्याय असू शकतात याचा आढावा घेतला आहे. हे पर्याय वापरूनही बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसले तर आणखी काय मार्ग आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना याबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
‘मकाई’च्या बिलावरून कांबळे यांचा बागलांसह जगताप व पाटील यांच्यावरही निशाणा

१) डॉ. वसंत पुंडे यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळाले पाहिजेत ही सर्वांची भावना आहे. राजकारणासाठी कारखान्यांचा वापर करून शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. याच भावनेतून आदिनाथला वाचण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, प्रा. रामदास झोळ यांच्यासह अनेक व्यक्तींनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून पैसे उभा केले. पुढे अनेक घडामोडी घडल्या, मात्र आता मकाईमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहेत. त्यात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे. हे टाळण्यासाठी सत्ताधारी बागल गटाने राजकारण बाजूला ठेऊन काही व्यक्तींना मदत मागितली पाहिजे. करमाळ्यातील लोक यासाठी पुढे येतील, असा विश्वास आहे. मात्र शेतकऱ्यांचे ही डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे.
थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात अधिकऱ्यांसमोरच शेतकऱ्याने घेतले अंगावर पेट्रोल ओतून

२) शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे यांच्या म्हणण्यानुसार मकाई कारखाना का अडचणीत आला याचा विचार करण्याची गरज आहे. तोंड लपवून बसण्यापेक्षा सत्ताधारी बागल गटाने शेतकऱ्यांना जाहीरपणे वास्तव सांगावे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी मदत म्हणून २१ हजार रुपये मी देतो. राज्यात मकाई हा एकमेक कारखाना आहे त्याने अद्याप गेल्यावर्षीच्या ऊसाचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांमध्ये सध्या संताप आहे. प्रशासनाने संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून मालमत्तेवर बोजा चढवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या पैशासाठी आम्ही लढा सुरु केला आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरु राहील. यापूर्वीही यासाठी आंदोलने झाली आहेत. मात्र आम्ही पैसे मिळाल्याशिवाय आता शांत होणार नाहीत. प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्याकडून सह्यांचे पत्र घेतले आहे. त्यावर कायदेशीर मार्गदर्शन घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल, असे सांगितले आहे.
‘काय सांगता’ न्यूज पोर्टलवरील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३) ऍड. राहुल सावंत यांच्या म्हणण्यानुसार मकाईला बँक कर्ज मंजूर होत नसेल तर संचालक मंडळाने त्यांच्या स्थांवर व जंगम मालमत्तेवर बोजा चढवावा. मकाईवर प्रशासनाने आरसीसी कारवाई केली आहे. कर्जासाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्याच्या सर्व संचालकांनी स्वतःच्या मालमत्तेवर आता कर्ज काढावे. किंवा त्यांच्याकडे जे पर्याय आहेत त्याचा वापर करून पैसे उपलब्ध करून शेतकऱ्यांचे देणे देणे आवश्यक आहे. काहीही करा पण शेतकऱ्यांचे पैसे द्या, अशी आमची मागणी आहे. २००९ मध्ये एका कारखान्यातील संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय छत्रपती संभाजी नगर खंडपोठाच्या निकालाचा संदर्भ आम्ही प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार कारवाई करून पैसे उपलब्ध करून द्यावेत. कायदेशीररित्या सध्या संचालक मंडळच यामध्ये निर्णय घेऊ शकते. त्यामुळे त्यांनी निर्णय घेऊन पैसे उपलब्ध केले पाहिजेत. तालुक्यातील ही सहकारी संस्था टिकली पाहिजे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. यापूर्वी अनेकदा लेखी आश्वासने दिली आहेत. ही देखील फसवणूक आहे. त्यामुळे फसवणुकीचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे.

४) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या म्हणण्यानुसार मकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे आहेत. ते देण्यासाठी सत्ताधारी बागल गटाने बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारकडून काही मदत लागत असेल आणि त्यांनी मदत मागितली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यांची भेट घेऊन यातून काय मार्ग निघेल का? यावर चर्चा केली जाईल. नाही तर कारखाना घाण ठेऊन पैसे उपलब्ध केले पाहिजेत. करमाळा तालुक्यातील शेतकरी हा सहनशील आहे. मात्र त्याची सहनशीलता आता संपू लागली असून टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मार्ग काढला पाहिजे.

५) आदिनाथचे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या म्हणण्यानुसार ‘मकाई’बाबत अनेकदा चुकीच्या बातम्या आल्यामुळे कर्ज प्रकरण लांबणीवर गेले. बागल गटात सध्या पोरगळपणा जास्त आहे. बँकेला परत पैसे मिळाले पाहिजेत याचा विश्वास निर्माण करण्यास सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार १ तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळतील, अशी शक्यता आहे. गेल्यावर्षी कारखान्यातून साखर बाहेर पडल्याबरोबर विक्री झाली. त्यामुळे काहीच साखर राहिली नाही. कारखान्याचे कर्ज मिळवणे हे सोसायटीत ज्याप्रमाणे ‘नवे- जुने’ केले जाते तसेच असते. मात्र गेल्यावेळी बँकेने पैसे घेतले पण कर्ज प्रकरण केले नाही. बागल गटाकडून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे हे वास्तव आहे. मात्र काही राजकीय परिस्थितीही कर्ज मंजूर न होण्यास कारणीभूत आहे. हे सर्व असले तरी शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. आणि पैसे मिळवण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत हा त्यांचा अधिकार आहे.’
याशिवाय तुम्हाला काय वाटते हे कळवा

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *