करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध कामासाठी सुमारे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील ८० लाखाचे टेंडर ओपन झाले असून 70 लाखाची कामे लवकरच प्रशासकीय मंजूर होऊन येतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
चिवटे म्हणाले, करमाळा शहरातील भुयारी गटार योजना, केंद्र सरकारच्या अमृत जल योजना, दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्प यासाठी सुमारे 160 कोटीचा प्रस्ताव सरकारकडे पडून आहे. त्यालाही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये भीमनगर येथे व्यायाम शाळा, कानड गल्ली येथे विविध ठिकाणी गटारी, 12 बंगले येथे ब्लॉक बसवणे, शितोळे घर ते गणपती मंदिर गटार बांधकाम, रंभापुरा चौक परिसर सुशोभीकरण व रस्ता करणे, गादिया घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता अशा कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले, करमाळा शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी आणला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही यासाठी मदत होत आहे.