करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिंदे गटाने जगताप गटाला बिनशर्त पाठींबा दिला आहे. तर पाटील व बागल यांच्यातही समझोता झाला असून ग्रामपंचायतमधील प्रत्येकी दोन व जगताप गटाला सहकारी संस्थामधील ११ जागा देण्याचा निर्णय अकलूज येथील ‘शिवरत्न’वर मोहिते पाटील यांच्या साक्षीने झाला आहे. या निर्णयामुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील पुन्हा एखादा किंग ठरले आहेत. येणाऱ्या काळात याचा काय परिणाम होणार हे मात्र पहावे लागणार आहे.
करमाळा बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप यांच्यासह शिंदे, पाटील, बागल गटाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवस राहिलेले असतानाच जगताप गटाला पाठींबा देत शिंदे गटाने अर्ज मागे घेतले. सावंत गटाचे सुनील सावंत हेही शिंदे गटाचेच समर्थक आहेत मात्र निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. पाटील व बागल गटाने बिनशर्त पाठींबा न देता त्यांना दोन-दोन जागा देण्यात आल्या आहेत. मग शिंदे गटाला का जागा नाहीत? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.
तिन्ही माजी आमदारांचे सुपुत्र संचालक होणार? करमाळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर
मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील जगताप, पाटील व बागल हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत. या एकत्र येण्याने मोहिते पाटील यांचे करमाळ्याच्या राजकारणात वर्चस्व असल्याचे पुन्हा दिसले आहे. मात्र येणार काळात याचा कसा परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकामध्ये हे तिन्ही गट एकत्र राहतील का? असा प्रश्न आहे. विधानसभेला या तिन्ही गटांच्या भूमिका काय असतील? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
करमाळा बाजार समिती बिनविरोध! जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; अकलूजमध्ये जगताप, पाटील व बागल गटाची बैठक
करमाळा बाजार समिती अडचणीत आहे हे ठीक पण याच बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत प्रचंड वाद झाला होता. आता हीच बाजार समिती बिनविरोध होणार अशी शक्यता आहे, तालुक्याच्या दृष्टीने ही चांगली बाब असली तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या समझोताचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीबाबत करमाळकरांच्या मनात नेमके काय आहे?