MLA Kishor Jorgewar is a political leader with leadership and social awareness born from struggle

राज्यातील सध्या सक्रिय व लोकप्रिय आमदारांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. चंद्रपूर मतदारसंघाबरोबरच राज्याच्या राजकारणातही ते कमालीचे सक्रिय असतात. जोरगेवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात सध्या विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत. सध्याच्या राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपले व्यक्तिमत्व ही चौफेर असावं लागतं. याची जाणीव असलेल्या किशोर जोरगेवार यांनी स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात सहभागी होत आपले व्यक्तिमत्व चौफेर केले आहे. सातत्याने समाजामध्ये राहणे, लोकांशी बोलणं त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर शंभर टक्के प्रयत्न करून मार्ग काढणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने…

2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी एक युवक नेतृत्व प्रयत्न करत होते. पण आपण थोडे थांबावे असे पक्षाने सांगितले. पक्षाचा आदेश मानून ते थांबले पण इथूनच आपल्या राजकीय सामाजिक कार्याचा वारू गतिमान गतिमान केला. 2014 मध्ये पक्षाने उमेदवारी नाकारली त्यामुळे शिवसेनेकडून निवडणूक लढवून द्वितीय क्रमांकावर राहिले. त्यानंतर 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि विक्रमी मताधिक्याने निवडून आले. २० वर्षाच्या काळात त्यांनी प्रत्येक टप्प्यावर संघर्षातून हे नेतृत्व उजळून निघाले आहे. आज चंद्रपूरमधून आमदार पदापर्यंत येऊन पोहोचले.

आमदार जोरगेवार हे तळागाळातून निर्माण व विकसित झालेले नेतृत्व आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य व्यक्ती ते आमदार असा चढत्या क्रमाने त्यांचा प्रवास झाला आहे. अर्थात हा प्रवास सहज झालेला नाही. प्रत्येक टप्प्यावर त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. म्हणून अपयशाने खचून न जाणे हा त्यांचा स्वभाव आहे.

आपल्या पहिल्या आमदारकीत जोरगेवार यांनी निर्भीड व अक्रमकपणामुळे विधानसभेच्या सभागृहाला देखील आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळासह अगदी जवळचे संबंध जोपासले आहेत. राजकारणाबरोबर समाजकारणातही ते नेहमीच अग्रेसर असतात. आमदार नसतानाही ही त्यांनी जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली होती. आमदार नसतानाही त्यांनी अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

राजकारणामध्ये विकासाचा चांगले व्हिजन डोळ्यासमोर असणारे माणसं असावी लागतात आणि योग्य वयात युवा पिढी सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झाली तर पुढे जाऊन एक परिपक्व आणि विकासाची दृष्टी असणारा नेता कसा तयार होतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रवास! पण हा प्रवास ही काही एका रात्रीत झालेली जादू नाही. त्यासाठी अथक परिश्रम, नवी शिकण्याची जिद्द, चौफेर वाचन, निरीक्षण शक्ती आणि थेट मैदानात उतरून विरोधकांशी भेटण्याची भिडण्याची धमक आणि दुसऱ्या बाजूला कोणतीही संकट असेल तर थेट माणूस सामान्य माणसाच्या मदतीला धावून जायचे वृत्ती यामुळेच आमदार किशोर जोरगेवार यांचे नेतृत्व हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या क्षितिजावर ठळकपणे समोर आलेले आहे.

यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत व राबवित आहेत आणि विविध उपक्रमांची एक सुंदर साखळी निर्माण केली. सध्याच्या राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपलं व्यक्तिमत्व ही चौफेर असावं लागतं. याची जाणीव असलेल्या किशोर जोरगेवार यांनी स्वतः ला वेगवेगळ्या क्षेत्रात सहभागी होत आपले व्यक्तिमत्व चौफेर केले आहे. ज्या माणसात जायचे त्या त्या माणसातल होऊन जायचे हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. लहान मुलांच्यात असेल किंवा तरुणांसोबतच्या वागण्यातला सहजपणा असेल किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींबरोबर वावरताना विचारांची प्रगल्भता असेल ही दोन्ही टोके त्यांनी तितक्याच सहजपणे अंगीकारले आहेत. अर्थात त्यासाठी सातत्याने समाजामध्ये राहणे, लोकांशी बोलणे त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रयत्न करून त्यावर शंभर टक्के मार्ग काढणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

चंद्रपूरमधील आलेला पुरावेळी त्यांनी अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला. कोरोना संकटाने जगाला हादरवून टाकले असताना त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करून या संकटाचा सामना केला. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपला 1 कोटींचा आमदार निधी पूर्णतः कोरोना उपयोजनासाठी देणारे पहिले आमदार ठरले. तसेच अम्मा कॅन्टीनच्या माध्यमातून गावातील अनेक निराधार वृद्धांना जेवण देण्याचे कार्य सुरू आहे. पण त्यांची कारकीर्द जवळून अनुभवताना एक गोष्ट नेहमीच जाणवत राहते, ती म्हणजे या सर्व राजकीय व सामाजिक जीवनामध्ये सातत्याने संघर्ष हा त्यांच्या वाट्याला आला आहे.तरीसुद्धा प्रत्येक टप्प्यावर धाडसाने आणि नियोजनबद्ध प्रयत्न करून यश मिळवले आहे. सामान्य माणसाशी जुळलेला धागा घट्ट करत आपल्या वेगळ्या शैलीने चंद्रपूरकरांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे.

विकासाची घौडदोड सुरूच
पहिल्यांदाच आमदार झाले असतानाही त्यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आपल्या कौशल्याने खेचून आणला आहे.शहरातील रस्ते, गटारी व ऐतिहासिक चौकांचे सुशोभीकरण व अन्य कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. तसेच दीक्षाभूमी,वढा तीर्थक्षेत्र यांना लवकरच निधी प्राप्त होईल.यासह इरई नदी सुशोभीकरण,धानोरा बॅरेज सह प्रस्तावित कामांसाठी त्यांचा जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

वीस वर्षे समाजकारणाची
वीस वर्षापासून आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेक सामाजिक कामांमध्ये हिरीहीरीने सहभाग घेत सर्वसामान्यांचे व तळागाळातील लोकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.तसेच अनेक विकासकामांचा डोंगर रचत शहरासह ग्रामीण भागात विकासगंगा पोहचवली आहे.महापूर असो वा कोरोना सर्वच अडचणीवर सामोरे जात निस्वार्थपणे जनतेच्या पाठीशी राहून अनेकांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी काम केले.पाणी प्रश्न असो रस्ते,गटर्स असोत किंवा अनेक मूलभूत प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी मार्गी लावले आहेत.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचे विकासकामे त्यांनी केले आहेत.परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.त्यांना वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा..

  • शब्दांकन : गणेश जगताप, स्वीय सहाय्यक, मंत्रालय मुंबई

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *