करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या कारभारावर सध्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणी पुरवठा आणि आरोग्याची समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. नगरपालिकेत सध्या प्रमुख अधिकारीच कोण नसल्याने जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न केला जात असून याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सावंत गटाचे प्रमुख सुनील सावंत यांनी दिला आहे.
करमाळा शहरात नियमित गटारी साफ केल्या जात नाहीत. पोथरे नाका येथे गटार तुंबली असून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. मौलालीमाळ परिसरातही असेच पाणी रस्त्यावरून वाहत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात, असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. करमाळा नगरपालिकेवर महत्वाचे जबाबदार अधिकारी सध्या नगरपालिकेत नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी करमाळा अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष फारूक जमादार उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नगरपालिका येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
करमाळा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील बाळेकर म्हणाले, करमाळा शहरातील नागरिकांना आहे. त्या मनुष्यबळातून सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.