सोलापूर : गडचिरोली येथून बदली होऊन आलेले कुमार आशीर्वाद यांनी सोलापूचा मिलिंद शंभरकर यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पांडुरंग गोडसे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

सरकारने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार 2016 च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची बदली मुंबई येथील महात्मा फुले जन आरोग्य सोसायटी आणि राज्य आरोग्य विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *