महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रॅगिंग आणि वाहतुकीच्या नियमांच्याबाबतीत जागरूक राहणे अत्यावश्यक

College students must be aware of ragging and traffic rules

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये तालुका विधि सेवा समिती करमाळा व तालुका वकील संघ यांच्या वतीने कायदा विषयक जागरूकता, रॅगिंग वाहतुकीचे नियम व आंतरराष्ट्रीय युवा दिन या विषयावर कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश एम. पी. एखे या होत्या.

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, उपप्राचार्य प्रा. संभाजी किर्दाक, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यावेळी होते. कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश आर. ए. शिवरात्री, पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. जगताप, अॅड. बी. आर. राऊत आणि अॅड. डॉ. बाबुराव हिरडे हे उपस्थित होते. अॅड. बी. आर. राऊत यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग कशा प्रकारे केले जाते याची उदाहरणे देऊन अँटी रॅगिंग कायद्यांची माहिती दिली. न्यायमूर्ती शिवरात्री यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले. अॅड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीचे प्रमुख प्रा. गौतम खरात यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नितीन तळपाडे यांनी तर प्रा. प्रदीप मोहिते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा न्यायालयातील नानासाहेब घाडगे, रामेश्वर खराडे, गणेश सावंत, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. अभिमन्यू माने, सुप्रिया पवार, राम घोडके, नवनाथ बिनवडे आणि बापू माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *