मद्यप्राशन करून गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा

करमाळा : टेंभुर्णी- नगर मार्गावर मद्यप्राशन करून ट्र्क चालवल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नानासाहेब रतन गोपाळ (वय ४१, रा. निर्मलनगर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल मयूर कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ८ तारखेला दुपारी साडेतीन वाजता संशयित आरोपी मद्यप्राशन करून ट्र्क चालवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *