श्रेयस तळपदेचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स

Dance on Shreyas Talpade song Bahrla Ha Madhumas

‘महाराष्ट्र शाहीर’मधील ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्याने सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं वेड लागलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका कुमारस्वामीने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स केला आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे. राधिका व श्रेयसने ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेपही केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *