सोगाव पूर्वच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे

Dattatraya Sarde as the President of School Management Committee of Sogaon East

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे तर उपाध्यक्षपदी शंकर नांगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदस्यपदी सचिन निकत, जोतीराम गोडगे, भारत भोई, अपर्णा भोसले, सुनिता गोडगे, प्रियंका मांढरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीसाठी मुख्याध्यापक श्री. ससाणे, शिक्षका तावसकर, गोडगे यांच्यासह तानाजी राखुंडे, अप्पासाहेब सरडे, रामभाऊ पांढरे, राहुल गोडगे, महेंद्र निकत, सचिन निकत, लालासाहेब सोनटक्के, विष्णू गोडगे, प्रमोद गोडगे, नंदू भोई, विनोद गोडगे, सतिश सरडे, बाळासाहेब सरडे, प्रविण सरडे, कृष्णा पांढरे, धनंजय गोडगे, शंकर राखुंडे, अजय गोडगे, ब्रम्हदेव सरडे आदी उपस्थित होते. निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन सोगाव ग्रामपंचायतचे सरपंच विनोद सरडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *