Degradation road work at Bitargaon Sri poor Demand for inquiryDegradation road work at Bitargaon Sri poor Demand for inquiry

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर निधीतून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची त्वरित चौकशी करा, अन्यथा आंदोलन केले जाईल. जोपर्यंत या रस्त्याच्या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत बिल काढू नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य चत्रभुज मुरूमकर, दादा मुरूमकर व प्रफुल मुरूमकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. बिटरगाव (श्री) येथे पांडुरंग वस्ती (कॅनल) ते ओढा (जुना करमाळा रस्ता) दरम्यान रस्त्याचे मुरुमीकरण सुरु आहे. मात्र ते काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. या गैरव्यवहावर झाला असल्याची शक्यता असून त्याची चौकशी करून नियमाप्रमाणे काम करावे, अन्यथा तोपर्यंत बिल काढू नये. याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेही त्यांनी मागणी केली आहे. या मागणीचे जिल्हा परिषद उपविभाग करमाळाचे उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर इतर नागरीकांच्याही सह्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *