Discipline lessons for Karmalkar in the month Police Inspector Vinod Ghuge emphasized on

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात बदली होऊन आल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पहिल्या दिवसापासूनच नगरिकांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारून साधारण एक महिना झाला आहे. पदभार घेतल्यानंतर पहिल्या दोनच दिवसात तहसील परिसराने मोकळा श्वास घेतला. तेथे बेशिस्तपणे वाहने उभा करणाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले आहे. याशिवाय रिक्षाचालकांना गणवेश सक्तीचा केला आहे. मेन रोडवर बेशिस्तपणा करणारांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. महिनाभरात त्यांनी नेमके कोणत्या कामांवर भर दिला आहे याचा ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने घेतलेला आढावा.

बदली होऊन नवीन ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक अधिकारी आपली काम करण्याची एक शैली दाखवत असतात. काही ठिकाणी तर त्याचे चुकीचे परिणामही जाणवतात. त्यातून काहीवेळी निर्णय ही बदलावे लागतात तर काही ठिकाणी तडकाफडकी बदलीचा परिणामही भोगावे लागतात. पण नगरिकांना विश्वासात घेऊन काम केले तर अधिकाऱ्यांना नागरिक अक्षरक्षा डोक्यावर घेतात याची अनेक उदाहरणे आहेत. त्याप्रमाणेचे पोलिस निरीक्षक घुगे यांनी केलेल्या कामाचे नागरिक कौतुक करत आहेत.

१) करमाळ्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलिस निरीक्षक घुगे यांनी तहसील कार्यालय येणारी वाहने बंद केली. तहसील व पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारात बॅरेकेटिंग लावण्यास सुरुवात केली. स्वतची गाडीही त्यांनी प्रवेशद्वाराबाहेर उभा करायला सुरुवात केली. आता बॅरेकेटिंग नाही केले तरी कोणी गाडी आतमध्ये नेहत नाही. नेहली आणि संबंधितांच्या नजरेस आली तर त्यावर कारवाई केली जाते. या निर्णयाचे स्वता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही पत्रकरांशी बोलताना स्वागत केले होते.

२) पोलिस निरीक्षक घुगे यांनी पदभार घेतल्यानंतर पोलिस हॉल समोर उभा केलेली करवाईतील व आपघाततील आणलेली वाहने हटवली आहेत. या वाहनामुळे पार्किंग उपलब्ध झाले आहे, शिवाय तहसील परिसराचा चेहरा मोहरही बदलला आहे. या निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक झाले आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्तीना सावलीही झाली आहे.

३) पोलिस निरीक्षक घुगे यांनी रिक्षा चालकांना गणवेश सक्तीचा करत असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यावर काय उपाययोजनाही त्यांनी सुचवण्याचे आवाहन केले होते. हा नियमही त्यांनी लागू केला आहे. सध्या करमाळा शहरातील प्रत्येक रिक्षा चालक खाक्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. फक्त नियम लावून चालत नाही तर त्याची अमलबजावणी होते की नाही हे स्वता पोलिस निरीक्षक घुगे पहात आहेत.

४) मेन रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या उभा करणारांमुळे अनेकदा सर्वसामान्य नगरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यावरही घुगे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गर्दीच्यावेळी पेट्रोलिंग करून बेशिस्तपणे वाहने उभा करणाऱ्यांवर कारवाई केले जात आहे.

५) बसस्थान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ठराविक वेळेत घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरू असतो. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. येणाऱ्या काळातही त्यांना करमाळ्यातील नागरीकांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचे काम करायचे आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *