करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, उपाध्यक्ष शिवाजी भोसले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गजानन गुंजकर व डॉ. अमोल डुकरे, सुभाष ओव्हाळ यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवळ, प्रविण कांबळे, शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे, उपाध्यक्ष जितेश रणबागूल, सचिन घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


