करमाळा (सोलापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दत्त पेठ येथील तानाजी सुरवसे यांच्याकडून मिरवणुकीत भीमसैनिकांना मोफत पाणी व शरबतचे वाटप करण्यात आले. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान सुरवसे यांच्याकडून भीम सैनिकांची ही सेवा केली जाते.
एकेकाळी दलित समाजाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. उच्चवर्णीय लोक पाणी पिण्यास देत नव्हते स्वतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याकाळी पाणी पिण्यास दिले नाही परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. सर्व बहुजनांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आदर दिसून येत आहे. सुरवसे व त्यांच्या पत्नी संगीता तानाजी सुरवसे त्यांच्या मुली व मुले हा उपक्रम दरवर्षी राबवतात. तानाजी सुरवसे दिव्यांग आहेत तरीसुद्धा त्यांचे कुटुंबीय ही सेवा करत आहेत. त्यांचे चिरंजीव उमेश सुरवसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे 14 एप्रिल चे औचित्य साधून नवीन मोटर गाडी घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यांचा जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकी दरम्यान सत्कार करून आभार मानण्यात आले.