सोलापूर : नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी (ता. 3) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय (सात रस्ता, सोलापूर) येथे होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे. आज (सोमवार) शासकीय सुट्टी असल्याने ऑक्टोबरमधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी होणार आहे. या लोकशाही दिनात गेल्या महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्ज, माहिती अधिकार अधि- 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. तरी सर्व विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

