Good news Water problem of 24 villages in Karmala taluka will be solved

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सोमवारी (ता. २) सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानुसार आज (रविवारी) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात उजनी धरण 33 टक्के भरल्यानंतर खरीप आवर्तन सुरू करण्याचा प्रघात आहे. यावर्षी करमाळा तालुक्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वजा पातळीमध्ये असलेले उजनी धरण अधिक 13 टक्के असतानाच आपण वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून विशेषबाब म्हणून आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. हवामान अभ्यासकांकडून येणारे अंदाज व भविष्यात उजनी धरण न भरल्यास सोलापूरसह इतर तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी आरक्षित केवले होते.

मात्र उजनी धरण लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. काल उजनी धरण 32 टक्के असतानाच आपण या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार व चर्चा केली. त्यानुसार आज कालवा सल्लागार समितीच्या बैठक होऊन दहिगाव योजनेचे आवर्तन सोमवारपासून सुरू होत आहे. या आवर्तनामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागाच्या 24 गावातील केळी बागांसह ऊस व इतर पिकांना जीवदान मिळणार आहे.

कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. 12 चे उपविभागीय अधिकारी एस .के. अवताडे म्हणाले, आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टप्पा 1 व टप्पा 2 या दोन्ही पंपगृहांची पाहणी केली आहे.सर्व पंप सुस्थितीमध्ये आहेत.टप्पा 1 दहिगाव येथील 6 पंपाचे टेस्टिंग केलेले आहे तसेच टप्पा 2 कुंभेज येथीलही 4 पंप टेस्टिंग करून ठेवलेले आहेत .त्यामुळे उद्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजना 100 टक्के क्षमतेने कार्यान्वित होण्यास काहीही अडचण येणार नाही. सर्वांना योग्य पद्धतीने पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *