Due to prolonged rains give assistance of one lakh per hectare to the Karmala taluka farmers Rahul Savant demandDue to prolonged rains give assistance of one lakh per hectare to the Karmala taluka farmers Rahul Savant demand

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी करपून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी केली आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्‍यांनी शेती मशागत करून पेरणी केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल अशी अशा होती. महागडी बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी करून शेतीची मेहनतीने त्याने मशागत केली आहे. परंतु पाऊसच न झाल्याने लागवड वाया गेली व आर्थिक संकटाचा भार पडला. शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ॲड. सावंत यांनी केली. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री धंनजय मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवर, आमदार संजयामामा शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *