करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आज (बुधवारी) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झाला असून करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय येथे त्यांचा सकल करमाळा मुस्लिम समाजाकडून जाहीर नागरी सत्कार होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्याधिकारी मंगेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत.
करमाळा दौऱ्यासाठी ते दीड वाजता सह्याद्री अतिथिगृहातून मुंबई विमानतळाकडे येणार आहेत. तेथून विमानाने ते सोलापूर येथे येणार आहेत. त्यानंतर तेथून ते मोटारीने करमाळा येथे येणार आहेत. साडेपाच वाजता करमाळा येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते मोटारीने पंढरपूर येथील शेगाव दुमाला येथे महाआरोग्य शिबिराला भेट देणार आहेत.