करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रम झाला. आज (शनिवारी) या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश करे पाटील होते. या कार्यक्रमास 1800 पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व रेश्मा भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला आहे.
शिंदे यांच्या व्याख्यानासह शाळेमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये 400 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांमध्ये अटीतटीचे सामने झाले. अंतिम सामन्यापर्यंत टिकलेल्या महिलांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढून त्यांना शाळेकडून पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या.
नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या पालकांचा एक गट व तिसरी ते दहावीपर्यंतच्या पालकांचा एक गट होता . नर्सरी ते दुसरीपर्यंत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान रूपाली सरोदे यांना मिळाला. त्यांना सोन्याचे बदाम बक्षीस देण्यात आले. प्रियांका बेडकुते यांचा द्वितीय क्रमांक आला असुन त्यांना चांदीचा वाटी व चमचा तर तृतीय क्रमांक मयुरी गंधे यांचा आला असून त्यांना चांदीचा छल्ला व उत्तेजनार्थ क्रमांक कल्पना फुके यांचा आला आहे. त्यांना शाळेकडून आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसरी ते दहावीपर्यंतच्या गटामध्येही चार क्रमांक काढण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक आरती पराठे यांचा आला असून त्यांना सोन्याचे बदाम, द्वितीय क्रमांक अनुराधा बर्डे यांचा आला असून त्यांना चांदीची वाटी व चमचा, तृतीय क्रमांक योगेश्वरी दराडे यांचा आला असून त्यांना चांदीचा छल्ला बक्षीस देण्यात आला. तर उत्तेजनार्थ प्रियांका पाटील यांचा आला असून त्यांना आकर्षक भेटवस्तू अशा आठ महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.