In the presence of MLA Sanjay Shinde workers entered the NCP in Fisret

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील फिसरे येथे राष्ट्रवादीच्या वतीने ‘शेतकरी मेळावा’ झाला. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या फिसरे- हिसरे- हिवरे- गौंडरे रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते. मेळाव्यात करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

हिवरे येथील अमोल फरतडे यांचे नेतृत्वाखाली सरपंच दत्तात्रय घाडगे, उपसरपंच शिवाजी खाडे, माजी उपसरपंच दिलीप फरतडे, ग्रामपंचायत सदस्य अतुल फरतडे, नामदेव जगताप, हनुमंत फरतडे, मोतीराम जगताप, तात्या फरतडे, शशिकांत मगर, शिवाजी फरतडे, दिगंबर काळे, केशव विटुकडे, वसंत काळे, नागनाथ शिंदे, भास्कर पाटील, विश्वास फरतडे, सुनील पाटील, जालिंदर फडतरे, हनुमंत चव्हाण, आप्पा शिंदे, दीपक लावंड, नागनाथ डवले, लक्ष्मण घाडगे, दत्तात्रय विटुकडे, तुकाराम शिंदे, दादासाहेब फरतडे, जालिंदर फरतडे, सुनिल फरतडे, कमलाकर फरतडे, हनुमंत फरतडे, आभिमान ओहोळ, ओंकार पुजारी, दादा सरवदे, अनिल शिंदे, बापू लोकरे, गणेश माने, दीपक विटुकडे, संजय मगर, महादेव मगर, दिनेश पाटील, भाऊसाहेब पाटील, आबाराजे डोले, नवनाथ खाडे, दादासाहेब फरतडे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बागल गटातून आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात बागल गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार शिंदे, माजी आमदार जगताप तसेच चंद्रकांत सरडे, दशरथशेठ घाडगे, ऍड. राहुल सावंत, डॉ. हरिदास केवारे, सतिश शेळके, भारत रोकडे, उद्धव माळी, नानासाहेब निळ, तानाजी झोळ, नानासाहेब मोरे, ऍड. नितीनराजे भोसले, तात्या सरडे, सुजित बागल, राजाभाऊ देशमुख, सुहास रोकडे, आशिष गायकवाड, सोमनाथ रोकडे, अनिल जगदाळे, किरण फुंदे, अभिषेक आव्हाड, धनंजय मोरे, आशपाक जमादार, प्रकाश थोरात, शितल क्षीरसागर, उदय ढेरे, रुपाली अंधारे, रविंद्र गायकवाड, स्नेहल अवचर, तात्यासाहेब शिंदे, सुभाष हनपुडे, मयूर रोकडे, उमेश मगर, नवनाथ जगदाळे, हनुमंत रोकडे, समाधान दोंड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवताडे यांनी केले. 2019 ते 2024 या कालावधीत केलेल्या विकासकामांचा आढावा आमदार शिंदे यांनी मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विकास वीर, रवी गायकवाड, समाधान दौंड, भाऊसाहेब अडसूळ आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाचा सन्मान यावेळी शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *