करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. याविरुद्ध आपण अपिलात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उपसभापती जगताप यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
जगताप म्हणाले, करमाळा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दाखल केलेला माझा अर्ज बेकायदेशीररीत्या नामंजूर केला आहे. त्याविरुद्ध आपण कायदेशीरपणे अपिलात जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणाच्या दाबाखाली येऊन हा निकाल दिला आहे का? अशी शंका निर्माण होत आहे. माझ्या अर्जावरील निकाल काहीही आला तरी आमचे गटप्रमुख जो आदेश देतील तो मी पाळणार आहे. अपिलात अर्ज मंजूर होणारच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून गटप्रमुखांनी मला अर्ज मंजूर झाल्यानंतर तो मागे घेण्यास सांगितले तरी अर्ज मागे घेणार आहे, असेही ते म्हणाले आहेत. या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनात जी सध्या बागल व पाटील गटाची युती आहे. ती युती होणार असून या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत. शेवट हा निर्णय मतदारांच्या न्यायालयातच होणार आहे, असेही जगताप म्हणाले आहेत. माझा अर्ज नामंजूर झाला असला तरी बंधू प्रतापराव जगताप व राहुल जगताप यांचा अर्ज मंजूर झाला आहे, असेही ते म्हणाले आहेत.
Karmala APMC election करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चिंतामणी जगताप यांच्यासह ६ अर्ज नामंजूर