Protest in Karmala over the incident that took place in the hall of Zilla Parishad Chief Executive Officer AvhaleProtest in Karmala over the incident that took place in the hall of Zilla Parishad Chief Executive Officer Avhale

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात झालेल्या मोड- तोड प्रकरणाचा करमाळ्यात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेने निषेध केला आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) संघटना शाखा, सोलापूर, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना यांनी ‘काम बंद’ आंदोलन करत या प्रकाराचा निषेध केला आहे. जिल्हा परिषद उपविभागचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन करमाळ्यात या आंदोलनाला पाठींबा देत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *