करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून ९ तारखेला निकाल असणार आहे. निवडणुकीसाठी सोमवार 4 तारखेपासून ८ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोसायटी मतदारसंघ ११ जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्ग व भटक्या विमुक्त १ अशा जागा आहेत. ग्रामपंचायत ४ त्यामध्ये सर्वसाधारण २ व एसी व आर्थिक दुर्बल १ जागा, व्यापारी २ व हमाल तोलार १ अशा जागा आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबा गावडे हे काम पाहणार आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल खंडागळे व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी (जिल्हा उपनिबंधक) किरण गायकवाड यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.