Election of Shinde as Taluka Youth President of Congress Karmala Taluk President Prataprao Jagtap's information in Congress Liaison Office

करमाळा (सोलापूर) : काँग्रेसच्या करमाळा तालुका युवक अध्यक्षपदी संभाजी शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीची माहिती करमाळा शहरातील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे. यावेळी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, राष्ट्रीय निरिक्षक कृष्णा अलावारु, प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आले असे जगताप यांनी पत्रकारांना आज (मंगळवारी) सांगितले.

युवकचे शहराध्यक्ष सुजय जगताप, ओबीसीचे तालुका उपाध्यक्ष सुलतान शेख, अशोक घरबुडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, ओबीसीचे जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘इथुन पुढे गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे कार्यकर्ता’ हे धोरण तालुक्यात राबवणार असुन काँग्रेसचे विचार समाजातील शेवटच्या तळागाळापर्यंत पोहचवणार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनीया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशिलकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष डाॕ. धवलसिंह मोहीते पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दशरथ जाधव, भैय्याराजे देशमुख, भाऊ भोसले, भिमराव शेलार, मयुर काळे, नाना जाधव, शहाजी शेळके, बाळासाहेब ठेंबे, विशाल शेलार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *