करमाळा (सोलापूर) : केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २४) पंढरपूर येथे संस्कार मंगल कार्यालय येथे ‘निर्यातक्षम केळी परिसंवाद, पहिली राज्यस्तरीय दूध परिषद व एकदिवसीय कृषी मेळावा’ होणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केळी उत्पादक शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष वैभव पोळ यांनी केले आहे.
पोळ म्हणाले, पंढरपूर येथे होणाऱ्या या कृषी मेळाव्याचे उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुल माने पाटील हे असणार आहेत. यावेळी विभागीय कृषी संचालक रफिक नायकवडी, भाग्यश्री पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय गवसाने. उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, जयवंत कवडे, डॉ. सुभाष घुले हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबर मार्गदर्शक म्हणून केळीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी कपिल जाचक व संजय बिराजदार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. राहुल बच्छाव, बाळासाहेब पाटील, विजयसिंह गायकवाड, सचिन गंगाधडे, अतुल पाटील, सचिन कोरडे, नामदेव वलेकर, पंढरीनाथ इंगळे, हनुमंत चिकणे, राजेश नवाल व संजय रोंगे हे उपस्थित राहणार आहेत.