Employment fair for unemployed women on TuesdayEmployment fair for unemployed women on Tuesday

सोलापूर (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवारी (ता. 26) पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटीआय डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, नर्सिंग, बी. कॉम, अशा प्रकारची एकुण 700 पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथिल उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत. नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह मंगळवारी 10 वाजता ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सोलापूर यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *