Extension of three months for submission of Non Creamy Layer and EWS certificate for Class 11 online admission

मुंबई : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेवून 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. 2023- 24 ची 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत.

या प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्युएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *