करमाळा (सोलापूर) : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने गैरव्यहवार केला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणाला गौरव झांजुर्णे, राजकुमार देशमुख, अविनाश वाघमारे, रविंद्र झांजुर्णे, रामहरी वारगड, श्रीकांत शिर्के, राजेंद्र दिंडोरे, पवन झांजुर्णे, वसंत शिर्के, सुर्यभान झांजुर्णे, बालु गुंजाळ, बाळासाहेब भोसले, प्रितम सुरवसे, दीपक पाटोळे, शहाजीराजे धेंडे, लक्ष्मण सावळकर, रमेश कांबळे, धनंजय डोंगरे, संजय जाधव, रामहरी घाडगे, फारुक जमादार, अण्णासाहेब सुपनवर, बापूराव तळेकर, संदीप तळेकर, रामदास झोळ आदींनी पाठींबा दिला आहे.
करमाळा तालुक्यातील रस्ता दुरुस्ती निधीची माहिती मागणी केली होती. मात्र मुदत संपूनही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गैरव्यहवार झाला असल्याचा आरोप असून याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.