करमाळा (सोलापूर) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने जामा मस्जिद येथे मिरवणुकीदरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाज करमाळा व शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य सचिन काळे, विजय लावंड, संजय सावंत, सुनील सावंत, अमोल यादव, सचिन घोलप, विनय ननवरे, सुरज वांगडे, महादेव फंड, भोजराज सुरवसे, सचिन गायकवाड, आरुण जगताप, पप्पू कसाब यांच्यासह सकल मुस्लीम समाज करमाळाचे जमीर सय्यद, रमजान बेग, आझाद शेख, जहाँगीर बेग, दिशान कबीर, फिरोज बेग, मुस्तकीम पठाण, शाहरुख नालबंद, आरबाज बेग, शाहीद बेग, शोयब बेग, अलतमश सय्यद, आलिम सय्यद, वसीम सय्यद व असंख्य मुस्लीम व हिंदु बांधव उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक एकोपा व बंधुभाव, एकात्मता कायम टिकून राहण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.