करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (वां) येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी झाला. बिटरगाव येथील शिवाजी राखुंडे व कुलदीप पाटील यांची करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मोहन गायकवाड यांना आचार्य दादासाहेब दोंदे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, गौरी निंबाळकरला वसंत महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक व साक्षी आरकीलेला महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत गोळा फेकमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल (दोन्ही विद्यार्थिनी डॉ. लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी नं. १ या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत), प्रा. शिवाजीराव बंडगर यांचा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहिल्याबद्दल व अर्जुन तकीक यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी बिटरगाव वांगी, भिवरवाडी, ढोकरी परिसरातील दत्ताबापू देशमुख, बिभीषण देशमुख, विठ्ठल शेळके, गणेश तळेकर, विकास पाटील, महादेव डुबल, काकासाहेब निंबाळकर, आबासाहेब नलवडे, शंकर सरडे, दादासाहेब भोसले, नागेश बोरकर, अमरसिंह आरकीले, पोपट मंगवडे, ज्ञानेश्वर धनवे, हनुमंत धनवे, कांतीलाल सरडे, नागनाथ राखुंडे, रणजित पाटील, दादासाहेब सरडे, भाऊसाहेब नलवडे, विठ्ठल सरडे, सचिन भोसले, समाधान रोडगे, माऊली पाटील, ज्ञानेश्वर मंगवडे, हनुमंत राखुंडे, शांतीलाल जानभरे, बळनाथ धनवे, पांडुरंग कोरे, अतुल कुलकर्णी, ज्ञानेश्वर नलवडे, गणेश जाधव, नाना सरडे, जोतिराम सरडे, दत्ता सरडे उपस्थित होते. आभार संदेश पाटील यांनी मानले.