करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर १ येथील दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आनंदवारी काढण्यात आली. यावेळी वारकरी पोशाख, अधूनमधून पडणारा पाऊस, टाळ मृदंगाच्या आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. केत्तूरमधून यावेळी फेरी काढण्यात आली. मैदानात रिंगण करून पारंपरिक भजन, फुगडी, भारुड असे खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचार्य मारकड यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.



