Food donation on the occasion of Pradipsheth Baldota birthday

करमाळा (सोलापूर) : सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती प्रदिपशेठ बालदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना येथे आज (शुक्रवार) अन्नदान करण्यात आले. करमाळा शहरात सात वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार, गरजु वृध्द नागरिकांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते. करमाळा शहर व परिसरातील गरजू या अन्नदानाचा लाभ घेतात. चिवटे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रोज सायंकाळी मोफत भाजीही वाटप केली जाते. त्यातूनच प्रदिपशेठ बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *