महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून यावर्षीपासून राज्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता व प्रशासनावरील विश्वास वाढावा हा या सप्ताहाचा उद्देश आहे. या सप्ताहात उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, लिफीक, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल आदींचा गौरव केला जाणार आहे.
या सप्तहात १ ऑगस्टला महसूल दिन साजरा करून सप्ताहाचे उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी ‘युवा संवाद’ होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध दाखले दिले जाणार आहेत. तिसऱ्या दिवशी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवला जाणार असून यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून कार्यवाही केली जाणार आहे.
चौथ्या दिवशी ‘जनसंवाद’मध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. यामध्ये ‘आपले सरकारवर’ आलेल्या तक्रारीही निकाली काढल्या जाणार आहेत. पाचव्या दिवशी ‘सैनिकाओ तुमच्यासाठी’मध्ये जिल्हा सैनिक कार्यालयाशी समन्व्य ठेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढले जाणार आहेत. सहाव्या दिवशी महसूल संवर्गातील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी संवाद’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रश्न निकाली काढले जाणार आहेत. सातव्या दिवशी या सप्ताहाचा समारोप होणार असून यामध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाणार आहे. याबाबतचा सरकार निर्णय