1 crore 40 lakh fund for 16 resettled villages in Mohol Madha and Pandharpur talukas

उजनीमुळे जिल्ह्यातील मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या १६ गावांसाठी सरकारकडून १ कोटी ४० लाख ८० हजार निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी नागरी सुविधांसाठी वापरला जाणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने आज (मंगळवारी) याबाबत आदेश काढला आहे.

उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील गावठाणातील नागरी सुविधा कामांना निधी वितरीत केला जाणार आहे. भीमा कालवा मंडळचे सहायक अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हा निधी दिला जाणार आहे. २०२३- २४ या वर्षात हा निधी खर्च केला जाणार आहे.

यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे, पटवर्धन कुरली, आव्हे, आढीव देगाव, मेढापूर. माढा तालुक्यातील उजनी टें., शिराळ टे, आलेगाव खु., सुर्ली, फूटजळगाव व मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथे गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधकाम करणे यासाठी निधी वितरित केला जाणार आहे. याशिवाय माढा तालुक्यातील सुर्ली येथे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा संरक्षक भिंत बांधकाम व डांबरी पोहोच रस्त्यावरील नालामोरीचे काम करण्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे. याबरोबर आलेगाव खुर्द येथे स्मशानभूमीसाठी निधी वितरित केला जाणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *