करमाळा (सोलापूर) : पक्ष म्हटलं की मतभेद राहणारच पण हे मतभेद विसरून आता निवडणुकीच्या कामाला लागा असे आवाहन करमाळ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आले आहे. या मेळाव्याला तरुणांनी गर्दी केली होती.
करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची आज (शुक्रवारी) पदाधिकारी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, युवकचे प्रदेश चिटणीस अभयसिंग जगताप, शरद पवार यांचे निकटवर्तीय आप्पासाहेब झांजुर्णे, प्रवक्ते महेश माने, बाळासाहेब पाटील, गोवर्धन चवरे, तालुकाध्यक्ष संतोष वारे, सचिन नलवडे, समाधान शिंदे, नलिनी जाधव, राजश्री कांबळे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात तालुक्यातील पक्षाची स्थिती सांगितली. ते म्हणाले, ‘दोन तालुकाध्यक्ष असल्याने मेळावा कोणी घेईचा हा प्रश्न पडतो आहे. काहीजण आमच्याबद्दल चुकीची माहिती वरिष्ठांपर्यंत सांगित आहेत. पण डुब्लिकेट पत्र वापरुन ब्लॅकमेल करणारे आम्ही नाहीत, असे म्हणत त्यांनी खदखद व्यक्त केली आहे.
प्रवक्ते माने यांनी मतभेद विसरून निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन करत संतोष वारे हेच तालुकाध्यक्ष राहतील असे जाहीर केले. जगताप यांनी लोकशाही वाचण्यासाठी या निवडणुकीत भाजपविरोधी मतदान करा, असे सांगितले. ‘पक्ष अडचणीत असून त्याला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. लवकरच काँग्रेस व ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांचा एकत्रित मेळावा घेण्यात येणार’ असल्याचे त्यांनी सांगितले.