करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा उद्या (शुक्रवारी) करमाळ्यात जनता दरबार होणार आहे. सोशल मीडियावर याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थांकचे स्टेट्स दिसत असून उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार शिंदे यांचा हा पहिल्याच जनता दरबार होणार असल्याने करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2025/02/6-2-25-1.pdf-Ghumre-Sir-722x1024.png)
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांचा पराभव झाला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा विजय झाला. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. निवडणूक निकाल झाल्यानंतर बागल यांनी भूमिका स्पष्ट करत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सांगितले होते. त्यानंतर माजी आमदार शिंदे भूमिका घेतील याबाबत उलटसुलट चर्चा होती. मात्र आता शिंदे हे जनता दरबारच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात संपर्क ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2025/02/6-2-25-2-724x1024.png)
माजी शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून करमाळ्यात विवाह सोहळा इतर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळ्यात आले होते. मात्र जनता दरबारच्या माध्यमातून ते शुक्रवारी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. माजी आमदार शिंदे यांनी करमाळ्यात येऊन नेहमीप्रमाणे नागरिकांना भेटावे, अशी मागणी होती. त्यानुसार त्यांचा हा जनता दरबार होणार आहे.