करमाळा (सोलापूर) : हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदचे माजी सदस्य व आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक स्व. सुभाष आण्णा सावंत यांची 73 वी जयंती 1 मे रोजी हमाल भवन येथे झाली. स्व. सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पांजरपोळ गोशाळेला चारा वाटप करणे, उपजिल्हा कुटीर रुग्णालयात फळे व खाऊ वाटप करणे तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिरमध्ये शुगर, बीपी, हिमोग्लोबिन आणि हृदयरोग रुग्णांची ईसीजी करून तपासणी करण्यात आली.
यावेळी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. वसंतराव पुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. हरिदास केवारे, डॉ. बाबूराव लावंड, गोपाळराव सावंत, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सावंत, मनोज गोडसे, राजू आव्हाड, गोविंद किरवे, वालचंद रोडगे आदी उपस्थित होते.
डॉ. पुंडे म्हणाले, हमाल पंचायत करमाळा व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी सुभाष सावंत यांची जयंती साजरी होते. यामध्ये आरोग्य शिबिरच्या माध्यमातून अनेक कष्टकरी हमाल तसेच गोरगरीब नागरिकांची तपासणी करण्यात येते आणि यातूनच खरी सेवा मिळते. यापुढेही हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी मोठी आरोग्य शिबीर आयोजित करावी यास आमचे संपूर्ण सहकार्य राहील असे ते यावेळी म्हणाले. ऍड. बलवंत राऊत, विलास जाधव, प्रा. विजय रोडगे, हभप हनुमंत काळे, सचिन काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रवीण जाधव, विठ्ठल रासकर, भोजराज सुरवसे, भाऊसाहेब काळे, शिंगटे, माऊली सुरवसे, बंडू अडसूळ, माॅन्टी खराडे, मजहर पठाण, भैय्या पाटील, बबन जाधव, दिलीप चव्हाण, अंकुश शिंदे, विठ्ठल शिंदे, भाऊसाहेब काळे, मनोज राखुंडे, रणजीत सावंत आदी उपस्थित होते.
माजी आमदार नारायण पाटील, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, संचालक जनार्दन नलवडे, आजिनाथ भागडे, गणेश करे पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, सावंत गटाचे सुनील सावंत, डॉ. निलेश मोटे, श्रीराम भोगल, माजी नगरसेवक ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. प्रशांत बागल, शहाजी शिंगटे, आण्णा झिंजाडे, महादेव वायकुळे, सतीश मोटे, सुरेश भोगल, देवा लोंढे, डॉ. सुभाष शेंद्रे, फारूक जमादार, दीपक सुपेकर, खलील मुलाणी, बाळू दळवी, पै. दादा इंदलकर, अलीम पठाण, संचालक शशिकांत केकान, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, पिंटू मुरूमकर, राजू रोडे, बिभीषण खरात, हवीन गायकवाड, हरिदास मोरे, धनंजय शिंदे, मदन देवी, ॲड. सचिन लोंढे, दिलमेश्वरचे मोरे, दिलीप मिसाळ, अंकुश माने, बबन म्हस्के, उत्कर्ष गांधी, दत्तात्रय अडसूळ, विलास रोडगे, बापू चांदगुडे, बापू बेंद्रे, योगेश गानबोटे आदी उपस्थित होते.
सदरचे आरोग्य शिबिर, फळे व खाऊ वाटप, चारा वाटप हे कार्यक्रम राबवण्यासाठी डॉ. संकेत सावंत, डॉ . दिपक केवारे, डॉ. अनुप खोसे, शरद वाडेकर, बापू उबाळे, मोहन आवटे, दादा शिंदे, बापू नलवडे, ज्ञानेश्वर गोसावी, सुनील शेळके , गजानन गावडे, गणेश काकडे , दिलीप माने , धनंजय सावंत, वैभव सावंत, प्रशांत सावंत, पप्पू रंदवे, पांडुरंग सावंत आदि जणांनी परिश्रम घेतले.