Request to MP Ranjitsinh Naik Nimbalkar to try for Jinti Police Station

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिंती येथे राजेभोसले परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली आहे. यावेळी श्रीमंत शहाजीराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी करमाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पश्चिम भागातील जिंती पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व ग्रामीण पोलिस यांच्या समन्वयातून शिफारस होणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. (Request to MP Ranjitsinh Naik Nimbalkar to try for Jinti Police Station)

पारेवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, जिंती रोड, कावळवाडी बोगदा, रामवाडी रेल्वे गेट बोगदा अर्धवट कामे निकृष्ट काँक्रिटीकरण झालेली असताना नव्याने साईड भिंत उत्तम गुणवत्तेने काँक्रिटीकरण इतर कामे व्हावीत यावर यावेळी चर्चा झाली आहे. संग्रामराजे राजेभोसले, अॅड. पृथ्वीराज राजेभोसले, अॅड. गिरीजाराजे भोसले व जिंतीचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *