करमाळा (सोलापूर) : धनुर्विद्या स्पर्धेसाठी गुरुकुल पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची सोलापूर जिल्ह्यातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयअंतर्गत शालेय सोलापूर जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा अरण (ता. माढा) येथील संत सावतामाळी विद्यालय येथे झाल्या. त्यात 14 वर्षाखालील मुलांच्या रिकव्हर राउंडमध्ये गुरुकुलच्या करण सरडे, ओम नरुटे, ओम गोयकर व अथर्व नरुटे या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्या चारही खेळाडूची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून धनुर्विद्या स्पर्धेत 150, 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी गुरुकुल पब्लिक स्कूल करमाळाचे वर्चस्व कायम टिकून ठेवले. विजयी खेळाडू दररोज सराव करत असतात. यात विशेषता धनुर्विद्या खेळाडूसाठी इतर खेळामध्येही संस्थेचे सर्वेसर्वा नितीन भोगे यांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे वर्चस्व टिकून राहिले. विजयी खेळाडूचे संस्थेच्या सचिव भोगे व HOD शिंदे, पवार यांनी अभिनंदन केले. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सागर शिरस्कर यांनी मार्गदर्शन केले.